पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें ॥१॥ असों एक जीवे प्राणें । मीतूंपणे वोसंडुनी ॥२॥ बहुत बरें म्हणती देव । ठेविले पाव विटेवरी ॥३॥ निळा म्हणे नव्हे तुटी । युगापाठीं युग जातां ॥४॥