पुंडलिके पिकविलें । विश्वा पुरलें न्यावया ॥१॥ त्रैलोक्यमणि लागला हातीं । लोक ते किती नेतील ॥२॥ विश्वनिर्मिता ज्याचे व्दारीं । निरंतरी तिष्ठत ॥३॥ निळा म्हणे भाग्य त्याचें । अपार वाचे वर्णवे ॥४॥