पुंडलिके पिकविलें – संत निळोबाराय अभंग – ३२४
पुंडलिके पिकविलें ।
विश्वा पुरलें न्यावया ॥१॥
त्रैलोक्यमणि लागला हातीं ।
लोक ते किती नेतील ॥२॥
विश्वनिर्मिता ज्याचे व्दारीं ।
निरंतरी तिष्ठत ॥३॥
निळा म्हणे भाग्य त्याचें ।
अपार वाचे वर्णवे ॥४॥
पुंडलिके पिकविलें ।
विश्वा पुरलें न्यावया ॥१॥
त्रैलोक्यमणि लागला हातीं ।
लोक ते किती नेतील ॥२॥
विश्वनिर्मिता ज्याचे व्दारीं ।
निरंतरी तिष्ठत ॥३॥
निळा म्हणे भाग्य त्याचें ।
अपार वाचे वर्णवे ॥४॥