पंढरिये केला वास । निज भक्तांस तारावया ॥१॥ म्हणे यारे-अवघे वर्ण । आदि ब्राम्हण करुनियां ॥२॥ जया वैकुंठासी जाणें । तया पेणें हें पंढरी ॥३॥ निळा म्हणे सुकाळ केला । भक्तां वोळला कुवासा ॥४॥