पंढरिये केला वास – संत निळोबाराय अभंग – ३२३
पंढरिये केला वास ।
निज भक्तांस तारावया ॥१॥
म्हणे यारे-अवघे वर्ण ।
आदि ब्राम्हण करुनियां ॥२॥
जया वैकुंठासी जाणें ।
तया पेणें हें पंढरी ॥३॥
निळा म्हणे सुकाळ केला ।
भक्तां वोळला कुवासा ॥४॥
पंढरिये केला वास ।
निज भक्तांस तारावया ॥१॥
म्हणे यारे-अवघे वर्ण ।
आदि ब्राम्हण करुनियां ॥२॥
जया वैकुंठासी जाणें ।
तया पेणें हें पंढरी ॥३॥
निळा म्हणे सुकाळ केला ।
भक्तां वोळला कुवासा ॥४॥