नामसमरणेंचि श्रीहरी । दासां दुरिता दूरी करी ॥१॥ तो हा पंढरिये ठाके । गुंतोनियां भक्ताभाके ॥२॥ हरिभक्तां या उध्दरी । तत्संगें आणिकांते तारी ॥३॥ निळा म्हणे ऐशी कीर्ती । सनकादिक संत गाती ॥४॥