ऐसा उदार देवादेवो । पंढरिरावो सुखसिंधु ॥१॥ ज्याचें देणें न सरे कधीं । कल्पावधीं पर्यंत ॥२॥ देवां दैत्यां शेषादिकां । सप्तहि लोकां मानवासी ॥३॥ निळा म्हणें ठाया ठावो । जाणें भावो अंतरींचा ॥४॥