ऐसा उदार देवादेवो – संत निळोबाराय अभंग – ३२०
ऐसा उदार देवादेवो ।
पंढरिरावो सुखसिंधु ॥१॥
ज्याचें देणें न सरे कधीं ।
कल्पावधीं पर्यंत ॥२॥
देवां दैत्यां शेषादिकां ।
सप्तहि लोकां मानवासी ॥३॥
निळा म्हणें ठाया ठावो ।
जाणें भावो अंतरींचा ॥४॥
ऐसा उदार देवादेवो ।
पंढरिरावो सुखसिंधु ॥१॥
ज्याचें देणें न सरे कधीं ।
कल्पावधीं पर्यंत ॥२॥
देवां दैत्यां शेषादिकां ।
सप्तहि लोकां मानवासी ॥३॥
निळा म्हणें ठाया ठावो ।
जाणें भावो अंतरींचा ॥४॥