नारद येऊनि पंढरियेसी । स्थळ पुंडलिकासी मागती ॥१॥ भीमापुष्पावती संगम । योजिला आश्रम तयाप्रती ॥२॥ विष्णूपदें उमटली जेथें । करविला तेथें रहिवास ॥३॥ निळा म्हणे पिंडदान । करिती सज्जन जे स्थळीं ॥४॥