नाना लोक धांवोनि येती । राशी भरिती आइत्या ॥१॥ घेऊनि जातां विश्वजनां । नव्हेचि उणा माल फार ॥२॥ युगें गेलीं बहाती लोक । न सरेचि पीक वोसंडलें ॥३॥ निळा म्हणे पुंडलिकें । केलीं लोकें सभाग्य ॥४॥