नाना लोक धांवोनि येती – संत निळोबाराय अभंग – ३१८
नाना लोक धांवोनि येती ।
राशी भरिती आइत्या ॥१॥
घेऊनि जातां विश्वजनां ।
नव्हेचि उणा माल फार ॥२॥
युगें गेलीं बहाती लोक ।
न सरेचि पीक वोसंडलें ॥३॥
निळा म्हणे पुंडलिकें ।
केलीं लोकें सभाग्य ॥४॥
नाना लोक धांवोनि येती ।
राशी भरिती आइत्या ॥१॥
घेऊनि जातां विश्वजनां ।
नव्हेचि उणा माल फार ॥२॥
युगें गेलीं बहाती लोक ।
न सरेचि पीक वोसंडलें ॥३॥
निळा म्हणे पुंडलिकें ।
केलीं लोकें सभाग्य ॥४॥