विटेवरी कैवल्यगाभा । राहिल्या उभा पंढरिये ॥१॥ आलियासी देतो धणी । सर्वां गुणीं संपन्न हा ॥२॥ भुक्ति मुक्ति देतो रिध्दी । स्थापितो पदीं अधिकारियां ॥३॥ निळा म्हणे पुरवी कोड । उरोचि सांकड नेदी हा ॥४॥