विटेवरी कैवल्यगाभा – संत निळोबाराय अभंग – ३१५
विटेवरी कैवल्यगाभा ।
राहिल्या उभा पंढरिये ॥१॥
आलियासी देतो धणी ।
सर्वां गुणीं संपन्न हा ॥२॥
भुक्ति मुक्ति देतो रिध्दी ।
स्थापितो पदीं अधिकारियां ॥३॥
निळा म्हणे पुरवी कोड ।
उरोचि सांकड नेदी हा ॥४॥
विटेवरी कैवल्यगाभा ।
राहिल्या उभा पंढरिये ॥१॥
आलियासी देतो धणी ।
सर्वां गुणीं संपन्न हा ॥२॥
भुक्ति मुक्ति देतो रिध्दी ।
स्थापितो पदीं अधिकारियां ॥३॥
निळा म्हणे पुरवी कोड ।
उरोचि सांकड नेदी हा ॥४॥