वरी बुकीयाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर ॥१॥ तुळशी नाना सुमनमाळा । दिव्यसंबराचा सोहळा ॥२॥ पांडुरंगा ओंवाळिती । नारीनर अवलोकिती ॥३॥ निळा म्हणे दिपावळी । सोडिती चंद्रभागाजळीं ॥४॥