याचि लागीं हरी – संत निळोबाराय अभंग – ३१३

याचि लागीं हरी – संत निळोबाराय अभंग – ३१३


याचि लागीं हरी ।
उभा चंद्रभागेतीरीं ॥१॥
भक्तांचिये हांकेसवें ।
उडी घालोलियां पावे ॥२॥
नेदी पडों दिठी ।
काळाची त्या घाली पोटीं ॥३॥
निळा म्हणे नामावरी ।
सर्वस्व हा उदार हरि ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचि लागीं हरी – संत निळोबाराय अभंग – ३१३