राही रुक्मिणी सत्यभामा । पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥ पुडंलिक दृष्टी पुढें । उभे देहूडे सनकादिक ॥२॥ जय विजय महाव्दारीं । गरुड शेजारीं हनुमंत ॥३॥ निळा म्हणे भोंवते संत । कीर्तनें करीत चौफेरीं ॥४॥