सहज गेलो पंढरपुरा – संत निळोबाराय अभंग – ३०७
सहज गेलो पंढरपुरा ।
विश्वंभरा भेटीसी ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥
ज्याचिये तेजें धवळलें नभ ।
हा जगदारंभ अंगकांति ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिकां ।
व्यापक लोकां सकळां जो ॥४॥
सहज गेलो पंढरपुरा ।
विश्वंभरा भेटीसी ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥
ज्याचिये तेजें धवळलें नभ ।
हा जगदारंभ अंगकांति ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिकां ।
व्यापक लोकां सकळां जो ॥४॥