सुकृताचा होता सांठा ।
भूवैकुंठा ते आले ॥१॥
सन्मुख देव भेटे तया ।
लागती पायां भाग्याचे ॥२॥
न्याहाळिती दृष्टि मुख ।
कैवल्यसुख तुच्छ पुढें ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदा ।
झाले तत्पदा अधिकारी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.