न पुरे धणी गुण गातां । रुप दृष्टी अवलोकितां ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल हरी । माझें बैसला अंतरी ॥२॥ मुख लावण्याची खाणी । राही वामांगी रुक्मिणी ॥३॥ निळा म्हणे दृष्टीपुढें । दिसे कोदले रुपडें ॥४॥