न पुरे धणी गुण – संत निळोबाराय अभंग – ३०२
न पुरे धणी गुण गातां ।
रुप दृष्टी अवलोकितां ॥१॥
बरवा बरवा विठ्ठल हरी ।
माझें बैसला अंतरी ॥२॥
मुख लावण्याची खाणी ।
राही वामांगी रुक्मिणी ॥३॥
निळा म्हणे दृष्टीपुढें ।
दिसे कोदले रुपडें ॥४॥
न पुरे धणी गुण गातां ।
रुप दृष्टी अवलोकितां ॥१॥
बरवा बरवा विठ्ठल हरी ।
माझें बैसला अंतरी ॥२॥
मुख लावण्याची खाणी ।
राही वामांगी रुक्मिणी ॥३॥
निळा म्हणे दृष्टीपुढें ।
दिसे कोदले रुपडें ॥४॥