सुकुमार साजिरें ठाण । धरिलें जघन दोन्ही करीं ॥१॥ विटेवरी दिव्यरुप । कोटि कंदर्प ओवाळिले ॥२॥ तुळसी माळा वैजयंती । कौस्तुभ दीप्ती पदकांची ॥३॥ निळा म्हणे हदयावरी । दिधली थोरी व्दिजपधा ॥४॥