विठो लावण्याची राशी । जननयनासी पाहुणेरु ॥१॥ पाहतिया तटस्थ लागे । फिरोंचि मागें विसरती ॥२॥ सुघटीत अवघेंचि ठाण । भूषणा भूषण् शोभवित ॥३॥ निळा म्हणे जडला जीवीं । त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥