विठो लावण्याची राशी – संत निळोबाराय अभंग – २९९
विठो लावण्याची राशी ।
जननयनासी पाहुणेरु ॥१॥
पाहतिया तटस्थ लागे ।
फिरोंचि मागें विसरती ॥२॥
सुघटीत अवघेंचि ठाण ।
भूषणा भूषण् शोभवित ॥३॥
निळा म्हणे जडला जीवीं ।
त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥
विठो लावण्याची राशी ।
जननयनासी पाहुणेरु ॥१॥
पाहतिया तटस्थ लागे ।
फिरोंचि मागें विसरती ॥२॥
सुघटीत अवघेंचि ठाण ।
भूषणा भूषण् शोभवित ॥३॥
निळा म्हणे जडला जीवीं ।
त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥