विठोजी कृपेचा सागर । दीनबंधु करुणाकर ॥१॥ म्हणोनियां स्तवित संत । होऊनि याचे चरणीं रत ॥२॥ उपेक्षूनियां न सांडी कोणां । शरणातां थोरां लहानां ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । तया मग न सोडी कल्पांतीं ॥४॥