विठोजी कृपेचा सागर – संत निळोबाराय अभंग – २९८
विठोजी कृपेचा सागर ।
दीनबंधु करुणाकर ॥१॥
म्हणोनियां स्तवित संत ।
होऊनि याचे चरणीं रत ॥२॥
उपेक्षूनियां न सांडी कोणां ।
शरणातां थोरां लहानां ॥३॥
निळा म्हणे धरिलें हातीं ।
तया मग न सोडी कल्पांतीं ॥४॥