वीटे साजिरीं पाउलें – संत निळोबाराय अभंग – २९७
वीटे साजिरीं पाउलें ।
कटीं कर विराजलें ॥१॥
तेचि आठवती मनीं ।
चित्त राहिलें चिंतनीं ॥२॥
तुळशीहार पदकें माळा ।
रुपाकृति घनसांवळा ॥३॥
निळा म्हणे वेधल्या वृत्ती ।
आनु कांहींचि त्या नेणती ॥४॥
वीटे साजिरीं पाउलें ।
कटीं कर विराजलें ॥१॥
तेचि आठवती मनीं ।
चित्त राहिलें चिंतनीं ॥२॥
तुळशीहार पदकें माळा ।
रुपाकृति घनसांवळा ॥३॥
निळा म्हणे वेधल्या वृत्ती ।
आनु कांहींचि त्या नेणती ॥४॥