ऐक्यरुपें हरिहर – संत निळोबाराय अभंग – २९६
ऐक्यरुपें हरिहर ।
उभा कटींकर विटेवरीं ॥१॥
तो म्यां देखिेयेला दिठीं ।
भूवैकुंठी पंढरीये ॥२॥
तुळसीमाळ वैजयंती ।
वेढिला संतीं मुनिवरीं ॥३॥
निळा म्हणे विश्रांती मना ।
झालें लोचना पारणें ॥४॥
ऐक्यरुपें हरिहर ।
उभा कटींकर विटेवरीं ॥१॥
तो म्यां देखिेयेला दिठीं ।
भूवैकुंठी पंढरीये ॥२॥
तुळसीमाळ वैजयंती ।
वेढिला संतीं मुनिवरीं ॥३॥
निळा म्हणे विश्रांती मना ।
झालें लोचना पारणें ॥४॥