सर्वस्वें उदार । देतां न म्हणे साने थोर ॥१॥ तें हें पंढरीये धेंडें । उभें पुंडलिकापुढें ॥२॥ अरिमित्रांसम । देणें एक निजधाम ॥३॥ निळा म्हणे नाहीं । जया आपपर कांहीं ॥४॥