पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें ॥१॥ चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ॥२॥ वेणुनाद गोपाळपुर । पुष्पावती सार संगम ॥३॥ निळा म्हणे झाला मेळा । या भूगोळा उध्दार ॥४॥