सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥ विठ्ठल राज देखतां दिठी । वास वैकंठी तेचि क्षणीं ॥३॥ निळा म्हणे आलिगंन । देतां समाधान जिवशिवा ॥४॥