राजा जाय तिकडे – संत निळोबाराय अभंग – २८९
राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती ।
वैभवें चालती समागमें ॥१॥
वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी ।
घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥
नाहीं उणें धनावस्त्रा आणि भूषणा ।
अन्ना काष्ठा जीवना तृणा सैन्या ॥३॥
निळा म्हणे देवा तुम्ही लक्ष्मीवर ।
उभे कटीं कर जयापाशीं ॥४॥