मागें पुढें अवघा हरी – संत निळोबाराय अभंग – २८८

मागें पुढें अवघा हरी – संत निळोबाराय अभंग – २८८

मागें पुढें अवघा हरी ।
घरीं दारीं हदयांत ॥१॥
याविण रितें न दिसे कोठें ।
सानें मोठें अणु रेणु ॥२॥
गगन दिशा महितळी ।
माजि पोकळीं तोचि तों ॥३॥
निळा म्हणे मनाबुध्दी ।
माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मागें पुढें अवघा हरी – संत निळोबाराय अभंग – २८८