पावो माझीं हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥१॥ तुजचि आवडीच्या सुखें । गातों वार्णितों ते मुखें ॥२॥ पढतों ज्या ज्या नामावळीं । वाजवूंनियां हातें टाळीं ॥३॥ निळा म्हणे ध्यानीं मनीं । जें कां चिंतितों चिंतनीं ॥४॥