पावो माझीं हेचि – संत निळोबाराय अभंग – २८६
पावो माझीं हेचि सेवा ।
करितों नित्यानित्य देवा ॥१॥
तुजचि आवडीच्या सुखें ।
गातों वार्णितों ते मुखें ॥२॥
पढतों ज्या ज्या नामावळीं ।
वाजवूंनियां हातें टाळीं ॥३॥
निळा म्हणे ध्यानीं मनीं ।
जें कां चिंतितों चिंतनीं ॥४॥