परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे । परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥ वेदविहितासी न पाडी अंतर । लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥ भोगुनी गौळणी होय ब्रम्हचारी । अलिप्तपणें चोरी दहीं दूध ॥३॥ निळा म्हणे सर्व अग्निसंगे जळे । परि दोशा नातळे अग्नी जेवीं ॥४॥