नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥ पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥ कांहींची नेदी जाऊं वांया । पाहे भक्तांचिया हाताकडे ॥३॥ निळा म्हणे संतोष मानी । क्षीराब्धीहुनी परमामृता ॥४॥