नामीं गोंवियली वाचा – संत निळोबाराय अभंग – २८३

नामीं गोंवियली वाचा – संत निळोबाराय अभंग – २८३

नामीं गोंवियली वाचा ।
मनीं संकल्प हा तुमचा ॥१॥
ऐसा वेष्टलों जी हरी ।
हातें पायें अवघ्यापरी ॥२॥
देखों जाय रुप तें दिठी ।
श्रवणीं त्याही तुमच्या गोष्टी ॥३॥
निळा म्हणे घरीं दारीं ।
देशी तूंचि देशांतरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामीं गोंवियली वाचा – संत निळोबाराय अभंग – २८३