दुजे नेणोनियां कांही । आठवितों तूतें देहीं ॥१॥ यासी साक्षी तूंचि कीं गा । अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥ जे जे उठती संकल्प । मनी तें तें तुमचे रुप ॥३॥ निळा म्हणे चित्तें वित्तें । होतें जें जें कांहीं जातें ॥४॥