तुमचीया बळें तुम्हांसवें – संत निळोबाराय अभंग – २७८

तुमचीया बळें तुम्हांसवें – संत निळोबाराय अभंग – २७८


तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें ।
आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥
याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं ।
ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥
तुम्हांसी न भजतां योगयाग सायास ।
तैंचि भवपाश होती फळें देऊनी ॥३॥
निळा म्हणे जप तप ध्यान संपत्ति ।
कृपेंविण तुमचे होती बंधना मूळ ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमचीया बळें तुम्हांसवें – संत निळोबाराय अभंग – २७८