उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं ।
सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥
म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका ।
वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥
हीन दीन मूर्ख परि शरण तुम्हासी ।
आलो हषिकेशी अंगिकारावा ॥३॥
निळा म्हणे तुम्ही देवा कृपा सागर ।
मी तंव किंकर लवण रेणू सानसा ॥४॥