असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन ।
करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥
होईल ते हो कैसी आमुची गती ।
नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥
सांगितलें संती करा नामाचा घोक ।
नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे विश्वासें त्या राहिलों ठायी ।
ठेऊनियां पायीं जीवभाव सकळ ॥४॥