देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें ॥१॥ हांसोनियां नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥२॥ बोबडें बोलणें । त्याचें म्हणे कोडिसवाणें ॥३॥ निळा म्हणे प्रीति करी । खेळविला उरावरी ॥४॥