गोपाळ विनोदें बोलती । तिरस्कारिती गोविंदा ॥१॥ लाज ना भये नाहीं काम यासी । मोकळा सकळांसी ठाउका असें ॥२॥ उगाचि बैसे पाहे खेळ । भोवंडा सकळ आपणांतूनि ॥३॥ निळा म्हणे भोगुनी सोळा सहस्त्र नारी । कैसा ब्रम्हचारी म्हणवितसे ॥४॥