गोपाळ विनोदें बोलती – संत निळोबाराय अभंग – २७०
गोपाळ विनोदें बोलती ।
तिरस्कारिती गोविंदा ॥१॥
लाज ना भये नाहीं काम यासी ।
मोकळा सकळांसी ठाउका असें ॥२॥
उगाचि बैसे पाहे खेळ ।
भोवंडा सकळ आपणांतूनि ॥३॥
निळा म्हणे भोगुनी सोळा सहस्त्र नारी ।
कैसा ब्रम्हचारी म्हणवितसे ॥४॥