पोसणाचि परी आवडला – संत निळोबाराय अभंग २७
पोसणाचि परी आवडला ।
मानु दिधला पुत्रपणा ॥१॥
मागें पुढें सांभाळिती ।
त्याचेंचि करिती कोड सदां ॥२॥
खांदी कडिये घेउनी सुखें ।
बोलों हरिखें शिकविती ॥३॥
निळा म्हणे ऐसे लोक ।
वानिती कौतुक परस्परें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पोसणाचि परी आवडला – संत निळोबाराय अभंग २७