हरीच्या पायीं विश्वासलें । सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥ दिवस रातीं नव्हतां तुटी । सांगती गोठी आलोकिका ॥२॥ ब्रम्हांनदें खेळती खेळ । करिती कल्लोळ गीतवादयें ॥३॥ निळा म्हणे निर्भय चित्तें । नाणती काळातें निजदृष्टी ॥४॥