सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा ।
आरते आरती करुं नंदाच्या गोवळा ॥१॥
हाचि जीव प्राण सोयरा सज्जन ।
ओवाळितां यासि बाई निवे तनुमन ॥२॥
करुनियां आरतीं पंचप्राण ज्योती ।
मिळोनियां सकळां बाळा श्रीमुख पाहाती ॥३॥
निळा म्हणे वेगळे धन्य पर्वकाळ ।
साधला हा आजि येथें आळवूं गोपाळ ॥४