मी तों नेणें याची लीळा । अकळकळा खेळ खेळे ॥१॥ पुढील सूचना जाणोनियां । आधींच उपाया करुनी ठेवी ॥२॥ निमित्य दावूनियां आणिकाचें । आपणचिं त्याचें रुप धरी ॥३॥ निळा म्हणे नवल पोटीं । वाटे शेवटीं मग कळे ॥४॥