जाईजण्या बळें पोरा – संत निळोबाराय अभंग – २६२

जाईजण्या बळें पोरा – संत निळोबाराय अभंग – २६२

जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी ।
विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी ॥१॥
पाहे हरिकडे ।
मग हुंबरी घाली कोडें ॥२॥
उडसील बळें ज्याच्या वोळखे तो आधीं ।
नाहीं तरि वायां जासी न पडे उपाधी ॥३॥
निळा म्हणे सांगितलें हीत धरी पोटीं ।
निजभावें शरण रिघे कान्हो जगजेठी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाईजण्या बळें पोरा – संत निळोबाराय अभंग – २६२