संत निळोबाराय अभंग

धरुनियां श्वास पोटीं सेवो – संत निळोबाराय अभंग – २६१

धरुनियां श्वास पोटीं सेवो – संत निळोबाराय अभंग – २६१

धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल ।
न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ ॥१॥
हुतुतु हुतुतु किती करिसी वेळोवेळां ।
होऊनियां नम्र भजे घननीळ सांवळा ॥२॥
धांवतां अविचारें पोरें धरिती टांगे ।
चलतां वळ मागें पडशील उगे ॥३॥
निळा म्हणे सांडूनियां हुतूतूचा बार ।
आठवी हा ध्यानीं मनीं नंदाचा कुमर ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धरुनियां श्वास पोटीं सेवो – संत निळोबाराय अभंग – २६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *